फुलोरा हा सूक्ष्म, सुंदर प्रतीकांनी सजलेला; प्रेमभावना, भक्ती, श्रद्धा, आत्मसाक्षात्कार यांची अनुभूती देणारा काव्यसंग्रह आहे. या कवितांमध्ये प्रेमातील कोमलता, विरहातील व्याकुळता, भक्तीतील समर्पण आणि आत्मिक शांततेचा शोध अशा विविध भावनांचा मनमोहक आविष्कार आहे. वाचकांना कधी स्वतःच्या भावनांची, अनुभवांची छाया या कवितांत दिसेल, तर कधी कृष्ण-राधेच्या दिव्य प्रेमरंगात वाचक रंगून जातील. कधी स्वबोधाची पायवाट दिसेल तर कधी नाम आणि सगुणभक्तीचे चिन्मय स्वरूप जाणवेल. भावनांचा हा बहरलेला विविधरंगी "फुलोरा" वाचकांच्या मनात घर करेल हे नक्की!
फुलोरा
Author’s Name:
मंजीता काळे
About the Author: मंजीता काळे यांनी अणुविद्युत व दूरसंचार अभियांत्रिकी (Electronics and Telecommunication Engineering) विषयात विद्यावाचस्पती (Ph.D.) ही पदवी प्राप्त केली असून गेली २० वर्षे या क्षेत्रामध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्या कथक नृत्यविशारद असून साहित्य, नृत्य, नाट्य, संगीत यांत त्यांना रुची आहे. Ph.D. साठी अभियांत्रिकी विषयामध्ये काम करतानाही त्यांनी विषयाचा पाया नाट्यशास्त्रामध्ये विषद केलेले "नवरस" हा निवडला होता. मंजीता काळे यांचे हे प्रकाशित होणारे पहिलेच पुस्तक आहे.
Book ISBN: 9789373147307
.png)
